‘तथापि’चा जिव्हाळा

‘तथापि’चा जिव्हाळा हे तथापिकडून अनेक वर्षे प्रकाशित होत राहिलेले त्रैमासिक आहे. स्त्रियांच्या समस्यांचा, हक्कांचा वेध घेणारा ‘मागोवा’, ‘शरीर साक्षरता’, ‘पारगावच्या पारावरुन’ बोलणाऱ्या कमळी आणि मंजुळी ही सदरं आणि या काल्पनिक व्यक्तिरेखाही वाचकांची खास आकर्षणं ठरल्या. माहिती आणि दृष्टीकोनाचे अवकाश विस्तारत राहिल्या. ‘माहितीच्या जगात’ या सदरातून वेगवेगळ्या पुस्तकांच्या, संसाधनांच्या ओळखी सातत्त्याने होत राहिल्या. अशा विविधांगी जिव्हाळ्याचे एकूण ४५ अंक प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातील सामाजिक संस्था-संघटनांपर्यंत, वाचकांपर्यंत तथापि’चा जिव्हाळा कित्येक वर्षे पोहचत राहिला आणि वाचकांनीही कधी चालता-बोलता दाद दिली, तर कधी पत्राद्वारे, फोनद्वारे, ईमेलद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवल्या. तथापिचा ‘जिव्हाळा’ हा तथापिच्या आजवरच्या समृद्ध वाटचालीतील सहप्रवासी आणि साक्षीदारही आहे!