सदाफुली

सदा फुलत राहण्याचा आणि त्यासाठी सन्मानासह जन्माला येण्याचा ‘मुलीचा’ हक्क अबाधित राहिला पाहिजे, यासाठी मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत वास्तव परिस्थितीचा धांडोळा घेणारे, कायदेविषयक माहिती पुरवणारे, स्त्री हक्कासाठी आवाज उठवणारे ‘सदाफुली’ हे एक जाणीव-जागृतीपर वार्तापत्र आहे. मुलीचा जन्म नाकारणाऱ्या समाजाच्या मानसिकतेविषयी, कायद्याचे उल्लंघन करत गर्भलिंग निदानाकडे सरसावणाऱ्या वृत्ती आणि कृतींविषयी, तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापराविषयी, वैद्यकीय यंत्रणेच्या गलथान कारभाराविषयी लिहिलं गेलं आहेच, याशिवाय एआरटी, पीसीपीएनडीटी, वैद्यकीय गर्भपाताचा कायदा, त्यातील बारकावे, योग्य अंमलबजावणी याविषयी सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.

तथापि ट्रस्टने या वार्तापत्राच्या पहिल्या ४ अंकांचे लेखन व संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्राकडून समुचित प्राधिकाऱ्यांसाठी सन २०१४ मध्ये हे प्रकाशित करण्यात आले होते.