इतर संसाधने

प्रक्रिया नोंद कशी करावी?

आपल्या कामाची नोंद ठेवणं, अहवाल लिहिणं हे प्रत्येक संस्थेसाठी, कार्यकर्त्यांसाठी एक महत्वाचं काम असतं. पण ते कसं लिहायचं, हे माहित नसल्याने अनेकदा हे काम अवघड वाटू लागतं. लेखन हा व्यक्तिगत कौशल्याचा भाग असला तरी थोड्या मार्गदर्शनाने ते प्रत्येकाला विकसित करता येऊ शकते, हा विश्वास बाळगून आणि कामाची गरज लक्षात घेऊन या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली.

पुस्तिकेचा उद्देश?

कार्यकर्त्यांना त्यांचे विचार, कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव, घडलेल्या घटना, त्याबाबतची कारणमीमांसा शब्दबद्ध करता यावी, प्रक्रिया म्हणजे काय आणि प्रक्रियेची नोंदणी कशी करावी; इत्यादी माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्याचा सदर पुस्तिकेचा उद्देश आहे. विशेषतः कार्यक्षेत्रातील स्त्री कार्यकर्त्यांचाही लेखनाबाबतचा विश्वास वाढावा, असाही एक विचार यामागे आहे.

ही पुस्तिका कुणासाठी?

सामाजिक, शासकीय संस्थांतील विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही पुस्तिका उपयुक्त आहे.

काय आहे या पुस्तिकेत?

गावपातळीवरील नेहमीच्या कामांचे संदर्भ घेऊन उदाहरणांद्वारे, चित्रांच्या माध्यमातून, प्रश्नोत्तरांतून, महत्वाचे मुद्दे अधोरेखित करुन सोप्या मांडणीतून प्रक्रिया नोंदणीविषयीची समज विकसित करण्याचा सुंदर प्रयत्न या पुस्तिकेतून केला आहे. मिटिंगचे मिनिट्स कसे लिहायचे, मासिक तसेच वार्षिक अहवाल, प्रकल्प अहवाल यांचे महत्व काय असते, ते कशा प्रकारे लिहावेत; याबाबत उपयुक्त मार्गदर्शन करणारी, गुणात्मक लेखनाचा दर्जा वाढवण्यास सहाय्य करणारी अशी ही पुस्तिका सन २००१ मध्ये तथापिने प्रकाशित केली आहे.