स्कूल कॅलेंडर

मुलींसाठी ‘सुरक्षित अवकाश’ ते मुला-मुलींसाठी ‘सुरक्षित अवकाश’ या प्रवासाचे साक्षीदार म्हणजे हे स्कूल कॅलेंडर! सुरक्षितता ते माझं शरीर, माझं मन, माझे हक्क या समतेच्या.. जीवन कौशल्ये आणि शरीर साक्षरता शिक्षणाच्या प्रवासातील काही साजेशी गाणी, मौज-मस्ती, गप्पा, गोष्टी आणि भेटी-गाठींचा ठेवा म्हणजे हे स्कूल कॅलेंडर! या प्रकल्पांतर्गत सर्व शाळांतील मुलांना, शिक्षकांना तथापिकडून देण्यात आलेली एक भेट आहे! या मुलांनी, शाळांनी या संपूर्ण प्रवासात तथापिला दिलेली आनंददायी सोबत, छायाचित्रांत गुंतून राहिलेले, मनापासून जगलेले अनेक क्षण ही कार्यकर्त्यांना त्याच्याकडून गवसलेली एक सुंदर भेट आहे.

हे स्कूल कॅलेंडर सन २०१४ मध्ये प्रकाशित केले आहे.