English |Contact her | Home
 
तिच्याविषयी
तिची प्रमुख क्षेत्रे
संसाधन केंद्र
संसाधन सुचीतील विषय
ग्रंथालय
आंदोलने
 
 

महाराष्ट्रातील आरोग्य संसाधनांची सूची

संसाधन संकलन आणि समन्वय

१९९९-२००० मध्ये अनेक स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी WAH! (महिला आणि आरोग्य) या व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. विशेषत्वाने महिला आणि आरोग्य या संदर्भातील माहिती, दृष्टीकोन आणि कौशल्ये पुरविण्याच्या हेतूने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात आरोग्याकडे एका व्यापक, ह्या दृष्टीकोनातून पाहण्यात आले आणि महिलांच्या आरोग्याच्या मुद्दाची सामाजिक बाजू लक्षात घेण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. एक वर्षाच्या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणात स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

तथापिने वाह! कार्यक्रमात संकलन केंद्र म्हणून काम पाहिले आणि महिला व आरोग्य या विषयांच्या संदर्भातील अनेक संसाधने व उत्तम साहित्य संकलित केले. ही माहिती तळागाळापर्यंत पोचविता यावी आणि महिला व आरोग्य यासंबंधीची संसाधने विकसित करता यावीत यासाठी तथापिची एक स्वतंत्र संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली.

वाह! कार्याक्रमाने आरोग्यविषयक प्रथा, ज्ञान आणि पद्धतींमधील प्रादेशिक विविधता यासारखे अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणले. या कार्यक्रमाने प्रशिक्षणासाठी सहाय्यभूत ठरणार्‍या संसाधनांच्या आवश्यकतेकडेही लक्ष वेधले. प्रशिक्षणाच्या काळात महाराष्ट्रात अनेक गट आणि समूह संसाधन विकासात गुंतल्याचे दिसून आले. परंतु या संसाधनांचा शोध घेणे कधीकधी खूपच कठीण असल्याचेही स्पष्ट झाले. राज्याच्या एका प्रदेशातील लोकांना राज्याच्या दुसर्‍या प्रदेशातील कार्यक्रमांबाबत क्वचितच माहिती मिळ्त असल्याने असे घडते आणि सर्व संसाधने सहज उपलब्ध होऊ शकतील असे कोणतेही एक ठिकाण राज्यात नाही. यातूनच स्‍त्रिया आणि आरोग्य या विषयांवरील संसाधने संकलित करण्याच्या आमच्या कल्पनेचा उगम झाला. या संसाधनांच्या सामूहीक वापरासाठी विविध संस्थांच्या दरम्यान समन्वय साधणे हेदेखील यामध्ये समाविष्ट आहे.

२००१ मध्ये आम्ही संसाधन संकलनाचे काम सुरु केले. महिला आणि आरोग्य या विषयावर काम करीत असलेल्या महाराष्ट्रातील १२० हून अधिक संस्थांना आमच्या गटाने भेट दिली. या भेटीदरम्यान या संस्था वापरत असलेल्या संसाधनांचे संकलन करण्यात आले. यामध्ये या संस्थांनी स्वतः आणि इतरांनी निर्मित केलेल्या साधनांचा समावेश होता. दोन वर्षे छोटया आणि जास्त प्रसिद्ध नसलेल्या संस्थांशी संपर्क करण्याचे प्रयत्‍न करण्यात आले. या संस्थांविषयीची माहितीही गोळा करण्यात आली.

या संसाधनांमध्ये भित्तीचित्रे, फ्लिपचार्ट, फ्लॅशकार्ड, कठपुतली, स्लाइड शो, दृकक्ष्राव्य चित्रफिती, खेळ, प्रशिक्षण पुस्‍तिका, भूमिका नाट्यासाठीचे साहित्य, गाणी आदीसारखे प्रशिक्षण साहित्य यांचा समावेश होता. या संसाधनांचे मूल्यमापन करण्यात आले आणि त्यातून साधी, उचित सूचनांद्वारे वापरण्यास सोपी, लिंगभावाबाबत संवेदनशील किंवा ज्यामध्ये स्‍त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दाखविण्यात येत नाही अशी आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे प्रस्थापित दृष्टीकोनाला प्रोत्साहन न देणार्‍या अशा संसाधनांची निवड करण्यात आली. या सर्व संसाधनांची सूची करण्यात आली. ती विक्रीसाठी तथापिकडे उपलब्ध आहे.

 

संसाधन सूची

 

 

 

 

Resource Mela