English |Contact her | Home
 
तिच्याविषयी
तिची प्रमुख क्षेत्रे
संसाधन केंद्र
ग्रंथालय
आंदोलने
 
 

ग्रंथालय

तथापिमध्ये ग्रंथालयाच्या वापरासाठी आम्ही अक्षरा वर्गीकरणाची पद्धती अवलंबिली आहे. त्यामुळे आता आमच्याकडे तथापि-अक्षर वर्गीकरण आहे. वर्गीकरण पहा ... आरोग्याशी संबंधित मर्यादित वषयांवरील ४०००हून अधिक पुस्तके आणि शेकडो दस्तावेज व वृत्तपत्रीय कात्रणे आमाच्याकडे आहेत. पुरुषांचे मुद्दे, लैंगिकता आणि पौरुषत्व, लिंगभाव आणि आरोग्य विकास आणि आरोग्याचे अर्थशास्त्र, आरोग्य आणि औषधांचा सामजिक इतिहास, सामुदायिक आरोग्य परंपरा, महिलांच्या आरोग्याची स्थिती, हिंसा आणि छ्ळ, लैंगिकता आणि किशोरावस्थेतील शिक्षण, प्रजननक्षमतेबाबत जागृती, पुरुष आणि लिंगभावाचे मुद्दे - पुरुषत्व आणि प्रजनन आरोग्य यासारख्या विषयांवरील पुस्तके गोळा करण्याचे विशेष प्रयत्‍न करण्यात आले आहेत. इंग्रेजीसोबतच मराठीतील पुस्तके गोळा करण्याचेही प्रयत्‍न करण्यात आले आहेत. त्याखेरीज आम्हाला इतर संस्थांकडून विशेष करुन लिंगभाव, आरोग्य आणि लैंगिकता यासारख्या विषयांवरील पत्रिका आणि नियतकालिकेही प्राप्त होतात.

तुम्हाला रुची असलेल्या कोणत्याही पुस्तकाविषयी आमच्याकडे विचारणा करा. आम्ही निश्‍चितच त्याला प्रतिसाद देऊ.

महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवरील काही ग्रंथांची सूचीदेखील देण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यातील पहिली सूची रजोनिवृत्ती (मेनोपॉज) या विषयावरील आहे. यातील पुस्तकांपैकी काही आमच्याकडे वाचण्यासाठी उपलब्ध आहे तर काही बाजारात उपलब्ध आहेत.

  • सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान ग्रंथालय सुरु असते.
  • ग्रंथालय सर्वांसाठी खुले असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
  • अगदी कमी ठेव शुल्काच्या मोबदल्यात ध्वनिफित, चित्रफिती आणि सीडी उपलब्ध आहेत.