तिच्याविषयी
तिची प्रमुख क्षेत्रे
संसाधन केंद्र
ग्रंथालय
आंदोलने

मराठी माहितीपत्रक

तथापिची पुस्तिकाची यादी

देणगी - आंनदी

देणगी - जिथे मानोसोपचारत नाही
मानसिक आरोग्य पुस्तिका

 

 

Join the campaign against violence against women
Support a radio jingle

 

 

 

नमस्कार!

पुढील तीन वर्षांसाठी आरोग्य अधिकार अभियान सुरु करण्याच्या हेतूने या वर्षी मराठवाडयाच्या ९ गावांतील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या ३० प्रमुखांसोबत आम्ही नुकतीच कामाला सुरवात केली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून रॉकेलवरील अनुदान रद्द केल्यामुळे महिलांच्या कामांच्या स्वरुपात झालेल्या बदलांचे दस्तावेजीकरणही आम्ही सुरु केले आहे. भारनियमन आणि पाण्याचे वितरण यामुळेही महिलांच्या कामाचे स्वरुन काम आणि काही क्षेत्रात सामाजिक स्थान यातही बदल झाला आहे. मुलांसोबत एक शैक्षणिक संसाधन म्हणून सुरु असलेल्या शालेय लैंगिकता शिक्षण कार्यक्रमाच्या दृक-श्राव्य दस्तावेजीकरणासाठी माधवी कपूर फाउंडेशनसोबत नव्याने केलेल्या भागीदारीमुळे आम्हाला नवे पाठबळ मिळाले आहे. आमची नवी संसाधने जरुर पहा : मासिक पाळी चक्र आणि सरक पट्टी, लिंगभाव, लैंगिकता, हिंसा आणि आरोग्य : पुरुषांसाठी प्रशिक्षण मार्गदर्शिका. ही आता इंग्रेजी, मराठी आणि हिंदीतही उपलब्ध आहेत.

मागील वर्ष हे जुन्या कार्यक्रमांमधून पुढे जाण्याचे आणि नव्या प्रयोगांचे होते. सख्य आणि समानतेच्या दिशेने : पुरुषांसोबत काम ह्या दोन्ही कार्यक्रमांच्या बाबतीत अंमलबजावणी आणि क्षमतावर्धनाच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही पुढे गेलो आहोत. आता आमच्या सहयोगी संस्था नियोजित कार्यक्रम हाती घेतील. समानतेच्या दिशेने : पुरुषांसोबत काम करताना या विषयावर सहयोगी संस्थांनी स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी प्रत्येक गावासाठी काही किमान आडाखे निश्‍चित केले आहेत. हा जाहीरनामा (Declaration) येत्या काही महिन्यातील कार्यक्रमांचा पाया आसेल.

जे आर डी टाटा ट्रस्टकडून मिळालेलं सलग दुसरं अनुदान शेवटच्या टप्प्यात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील संस्थांकडून महिला आणि आरोग्य संसाधने या विषयावरील वाढती मागणी पाहता आम्हाला विशेष आनंद होत आहे. विशेषत्वाने जेथे आम्हाला सातत्याने पोचता येते त्या मराठवाडा भागातील संस्थांच्या बाबतीत आम्ही विशेष आनंदी आहोत. या द्विमार्गी प्रक्रियेने आम्हाला सतत सजग राहता येते आणि महिलांच्या जीवनातील बदलांचे (उदा. लग्न जमविण्याच्या बदलत्या पद्धती किंवा महिलांचे काम) दस्तावेजीकरण करता येते.

स्त्रियांवरील हिंसेचा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी जोडण्यात यावा यासाठी आम्ही केलेले सातत्यपूर्ण प्रयत्‍न यथावकाश परंतु निश्‍चितपणे यशस्वी होत आहे. हिंसेच्या घटनांची आता प्रथमच ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५ खासगी (सेवाभावी) डॉक्टरांच्या सहाय्याने दवखान्यात नोंदणी होत आहे.

शाळांमधील लैंगिक शिक्षणाचा मुद्दा प्रसारमाध्‍यमांतून अलीकडेच मोटया प्रमाणात चर्चेला आला. याचा परिणाम म्हणून आमच्या शालेय कार्यक्रमाबाबत आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या प्रशिक्षणासाठी आनेक जण आमच्याकडे विचारणा करीत आहे. ५वी, ६वी आणि ७वीच्या इयत्तेसाठी संबंधित कार्यपुस्तिका पुर्ण करण्यासाठी आम्ही वेगाने काम करीत आहोत. या कार्यपुस्तिका याबाबतचा आभ्यासक्रम निर्धारित करतील आणि शाळांमध्‍ये काम करण्यासाठी अत्यावश्यक असलेले संसाधनही पुरवतील.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

       
©Copyright Tathapi Trust