English |Contact her | Home
 
तिच्याविषयी
तथापिचं ध्‍येय
आमचे विश्‍वस्त मंडळ
आमचे अर्थदाते
तिची प्रमुख क्षेत्रे
संसाधन केंद्र
ग्रंथालय
आंदोलने
 
 

तिच्याविषयी

तथापि एक महिलांची संस्था आहे. २००० मध्‍ये तिच्या स्थापनेपासून ‘महिला आणि आरोग्य संसाधन विकास’ या क्षेत्रात काम करीत आहे. ती भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्‍चिम भागातील पुणे शहरात स्थित आहे.

तिच्या कामाची प्रमुख अंगे:

  • महिलांच्या दृष्टीकोनातून आरोग्यविषयक प्रशिक्षण आणि समर्थन,
  • स्थानिक समूहांना महिला आणि आरोग्यविषयक संसाधने प्राप्त होण्यासाठी प्रयत्‍नशील राहणे.
  • ‘शरीर साक्षरते’च्या माध्यमातून लैंगिकतेचे शिक्षण देणे हे तिचे एक प्रमुख क्षेत्र आहे. शरीर, लिंगभाव, लौंगिकता, जननक्षमता आणि सत्ता यांच्या संबंधात तथापिने तयार केलेली आणि शैक्षणिक दृष्टीकोनातून राबविण्यात येणारी ही एक संकल्पना आहे.

तथापि लोकांच्या आरोग्याच्या आणि त्यासंबंधीच्या माहितीच्या अधिकाराचे समर्थन करते. ती समतेसाठी आर्थिक आणि सामाजिक संघर्षांचा गाभा म्हणून आणि ‘सर्वांसाठी आरोग्या’ साठी अत्यावश्यक घटक म्हणून लिंग समभावाकडे पाहते. आपल्या आरोग्याच्या आणि स्वास्थ्य संसाधनांचे संवर्धन व विकास करण्याच्या स्थानिक समुदायांच्या अधिकाराचे ती समर्थन करते. मुले ही बदलांसाठीचा पाया आहेत आणि त्यांच्यात भेदभावरहित, मुली आणि स्त्रियांवर हिंसा घडणार नाही असं जग घडवणं शक्य आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात मुलांसोबत काम करण्याच्या कार्यक्रमांचा तिच्या कामात समावेश झाला आहे.

पुरुषत्वाच्या कल्पना समजून घेण्यासाठी आणि पुरुषांसोबत काम करण्यासाठी ती एक पथदर्शी कार्यक्रमही राबवित आहे.

तथापि ट्रस्ट "स्रिया आणि आरोग्य संसाधन संवर्धन"
रेणुप्रकाश-अ/३ रा मजला,
८१७, सदाशिव पेठ,
नागनाथ पार जवळ,
पुणे - ४११ ०३०.
महाराष्ट्र, भारत

संपर्क : ९१ - ०२०-२४४३११०६ / ०२०-२४४३००५७

इ-मेल : tathapi@tathapi.org or tathapi@gmail.com

 

* ध्‍येय आणि दृष्टिकोन * विश्‍वस्त मंडळ