Tathapi
Tathapi - Digital Resource Centre

Tathapi promotes innovative women and health training and advocacy initiatives for community health and development in Maharashtra.

स्त्रिया आणि आरोग्य या क्षेत्रात संसाधन निर्मिती आणि संवर्धनाचे उद्दिष्ट ठेवून तथापि ट्रस्ट ही संस्था १९९९ साली स्थापन करण्यात आली. त्या आधी राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी सुरू केलेल्या 'वाह!' या स्त्रिया आणि आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमात तथापिने संसाधन केंद्र म्हणून काम केले. त्यादरम्यान गोळा झालेली सर्व संसाधने आणि माहितीतून प्रेरणा घेत स्त्रिया आणि आरोग्य या विषयावरील संसाधने कार्यकर्त्यांना एकाच छताखाली मिळावीत यासाठी तथापिने संसाधन केंद्र सुरू केले.

तेव्हापासून पुढील २० वर्षांहून अधिक काळ तथापिने आरोग्य, हिंसा, समानता, लैंगिकता आणि अपंगत्व अशा विविध विषयांवर मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये विविध स्वरुपाची संसाधने तयार केली. गावपातळीवर आणि शहरी वस्त्यांमध्ये काम करत असताना तिथे समोर आलेल्या प्रश्नांवर आम्ही माहिती गोळा करत राहिलो. प्रशिक्षणांमधून, कार्यकर्त्यांच्या, स्त्री-पुरुषांच्या अनुभवातून शिकत शास्त्रीय दृष्टीकोनातून स्त्रियांच्या आरोग्याकडे, सामुदायिक आरोग्याकडे पाहत जनस्नेही आणि स्त्रीकेंद्री संसाधने तयार करत राहिलो.

गावपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहज समजतील, आपल्या कामात वापरता येतील, स्त्रीकेंद्री दृष्टीकोन देतील अशा पुस्तिका, पोस्टर, प्रशिक्षण साहित्य, मार्गदर्शक पुस्तके, मॉडेल तथापिने तयार केली आणि ती अतिशय लोकप्रिय ठरली. अनेक प्रकाशने शासनातर्फे वितरित केली गेली.

तथापि संस्थेचे हे सारे काम आता डिजिटल स्वरुपात सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. आमची प्रकाशने या साइटवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असतील. आपल्या कामात, माहिती घेण्यासाठी, इतरांना देण्यासाठी आपण या संसाधनांचा वापर करू शकता. ही प्रकाशने आपण विनाशुल्क वापरू शकता. ती कुठल्याही स्वरुपात विकली जाऊ नयेत. संसाधनाचा वापर करताना, ‘स्रोत – तथापि ट्रस्ट’ असा उल्लेख करावा. साइटवरील चित्रं, फोटो, पोस्टर, फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात अशी आमची इच्छा आहे. या सर्वांचा वापर ना नफा उपक्रमांसाठी करता येईल. मात्र वरीलप्रमाणे उल्लेख करूनच हे साहित्य वापरण्यात यावे.

अधिक माहितीसाठी tathapi[at]gmail.com या ई-मेल वर संपर्क साधा.